अमरावतीत बंदच्या आडून दंगल घडवण्याचा कट, नवाब मलिक यांचा भाजपवर आरोप

Nawab Malik accused in BJP : अमरावतीत बंदच्या आडून दंगल घडवण्याचा कट दिसून येत आहे, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे. 

Updated: Nov 16, 2021, 07:54 AM IST
अमरावतीत बंदच्या आडून दंगल घडवण्याचा कट, नवाब मलिक यांचा भाजपवर आरोप  title=
संग्रहित छाया

मुंबई : Nawab Malik accused in BJP : अमरावतीत बंदच्या आडून दंगल घडवण्याचा कट दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे. यावेळी त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे रझा अकादमीसोबतचे फोटो शेअर केलेत. तर मलिकांवर अब्रुनुकसानीचा खटला भरणार, असा इशारा अनिल बोंडे यांनी इशारा दिला आहे. (Nawab Malik accused BJP of plotting riots in Amravati)

अमरावती हिंसाचाराला महाविकास आघाडी सरकार जबाबदार - भाजप

दरम्यान, अमरावती आणि राज्याच्या इतर भागात आता परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, रझा अकादमीची दंगलीत काय भूमिका होती, अशी विचारणा केली असता कोण जबाबदार आहे, हे चौकशीत स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कारवाई करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपने बंदचे आवाहन केले होते. यावेळी काहींनी दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर दुकानांचे तोडफोड करण्यात आली. तर काही दुकाने पेटवून लावली. (BJP bandh turns violent) दुसरीकडे अमरावतीमध्ये दुकाने फोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दंगली घडवण्यामागे भाजपचा हात असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचे त्यांनी खंडन केले. 

दंगल घडवून आणली, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवून आणली आहे. दंगली घडवणे हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.