धक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच..

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत मामाने 15 वर्षाच्या भाचीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

आकाश नेटके | Updated: Feb 5, 2024, 12:47 PM IST
धक्कादायक! 15 वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; मुलगी गर्भवती असल्याचे कळताच.. title=

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत 15 वर्षीय भाचीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे कळल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मामाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. गेल्या वर्षी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

नेरुळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 4 ऑक्टोबर 2023 रोजी त्याच्या घरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर तिला तात्काळ गोवंडी भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे ती गर्भवती असल्याचे उघड झाले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी नेरूळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानतंर नेरुळ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला असता आरोपी मुलीचा मामा असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं. यानंतर रविवारी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती नेरुळ पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत चार वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार

मुंबईच्या कांदिवली पूर्व इथल्या एका शाळेतील सुरक्षा रक्षकाने चॉकलेट देण्याच्या बहाण्याचे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात मुलीच्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 55 वर्षीय सुरक्षा रक्षकाविरोधात बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षांच्या मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

शाळेच्या शौचालयात आरोपी सुरक्षा रक्षकाने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेले होते आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.