स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईच्या ( Navi Mumbai) रबाळे एमआयडीसी भागात नवरात्र (navratri) उत्सवात वेडेवाकडे कृत्य करणाऱ्या तरुणाला दांडीया (dandiya) खेळण्यास मज्जाव करणाऱ्या तिघांवर लोखंडी हातोड्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांपैकी आकाश जयस्वाल या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
रबाळे एमआयडीसीतील साईबाबा नगर येथे गरब्याचे (garba) आयोजन करण्यात आले होते. गरबा खेळत असताना आरोपी जितेंद्र पटवादेखील (jitendra patwa) गरबा खेळण्यासाठी आला. मात्र जितेंद्र पटवा हा वेडेवाकडे नृत्य करत त्याला मंडळातील तिघांनी दांडिया खेळू नको असे सांगत गरब्यामधून जाण्यास सांगितले. (navi mumbai Angry man attack three people who were sleeping in a mandap with hammer)
जितेंद्र पटवाला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी जितेंद्र पटवा हा वेडेवाकडे इशारे करत देवी समोर नृत्य करत"मला दांडीया का खेळू दिला नाही"; मंडपात झोपलेल्यांवर लोखंडी हातोड्याने तरुणाचा हल्ला होता. त्याला थांबण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र सांगितल्यानंतरही आरोपी वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले. हाच राग मनात ठेऊन आरोपीने मध्यरात्री मंडपात झोपलेल्या तिघांना मला दांडीया का खेळू दिला नाही असा जाब विचारत त्यांच्यावर हातोड्याने हल्ला केला.