मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. १९७५ च्या आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण होतायत. या निमित्ताने मुंबई भाजपाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय इथंच पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. यावेळी, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणी आणि लोकशाहीवर भाष्य केलंय. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, रावसाहेब दानवे हेदेखील मंचावर उपस्थित आहेत.
आज आणीबाणीचा ४३ वा वर्धापन दिन...
आणीबाणी हा लोकशाहीला लागलेला कलंक - मोदी
पारतंत्र्य अनुभवता येत नाही - मोदी
एका घराण्यासाठी देशावर आणीबाणी लादण्यात आली
एका घराण्यासाठी घटनेचा दुरुपयोग करण्यात आला
घटनेचा दुरुपयोग कसा करता येतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आणीबाणी
जागरुक नागरिक काळ्या दिवसाचं स्मरण करतात
भाजपतर्फे देशभरात काळा दिवस
काळा दिवस काँग्रेसविरोधी नाही - मोदी
आजच्या तरुणाईला आणीबाणीची धग कळणार नाही - मोदी
आणीबाणीनंतर काँग्रेसची मानसिकता बदललीच नाही
आणीबाणी, महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता
पंतप्रधान मोदींची गांधी घराण्यावर जोरदार हल्लाबोल
काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही नाही
पंचायत ते संसद एकाच कुटुंबाची सत्ता
४०० वरून ४४ वर आल्यावर निवडणूक आयोगावर सूड...
ईव्हीएमवर आरोप ही सूडाची भावना - मोदी
पराभवाचं खापर ईव्हीएमवर
पराभव दिसू लागल्यावर ईव्हीएमला दोष
स्वार्थासाठी पक्षाचेही तुकडे केले
सत्तासुखाच्या मोहामुळे देशाचा सुरुंग केला
न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यात आला
आणीबाणी काळात न्यायव्यवस्था भयभीत
किशोर कुमारांना रेडिओवरून हटवण्यात आलं
किशोर कुमार यांची काय चूक होती?
आणीबानीनंतर 'आँधी' चित्रपटावरही बंदी
माध्यमांच्या आजच्या भूमिकेवरही जोरदार टीका
लोकशाहीबाबत आस्था जागृत ठेवली पाहिजे
काँग्रेसनं आरएसएस, जनसंघाविरोधी दहशत पसरवली
मोदींच्या नावानं देशात भय पसरवलं जातंय
घटनेचा खून करणाऱ्यांना आज घटना धोक्यात दिसतेय
आणीबाणीनंतर काँग्रेस पराभूत का झाली?
काँग्रेसला लोकशाहीचा कधी अंदाजच आला नाही
सत्ता गेल्याचं दु:ख सहन होत नाही
सामान्य भारतीयांमध्ये लोकशाही भिनलीय
आणीबाणीनंतर लोकांनी लोकशाही जगवली
जनतेनं लोकशाहीला पुनर्जन्म दिला
यानंतर, बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात काही उद्योगपतींच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आलं आहे. ॉसंध्याकाळी 4 च्या सुमारास मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.