मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली आहे.
रोज सकाळी दीड ते दोन तास लेखन करतात. पुढच्या वर्षी १० एप्रिलला वाढदिवशी प्रकाशन करण्याचा राणेंचा मानस आहे. या आत्मचरित्रात राणेंच्या बालपणापासून तर आतापर्यंतच्या अनेक घडामोंडींचा वेध राणे स्वतः घेणार आहे. या पुस्तकातून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असतानाच्या अनेक घडामोडींचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
राजकारणातील व्यक्तीला सर्वच सत्य उघड करता येत नसले तरी आत्मचरित्रात वास्तवाशी जास्तीतजास्त प्रामाणिक राहण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता या आत्मचरित्राकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.