मुंबई : मुंबई विद्यापीठात पेपर तपासणी रखडल्यामुळे निकाल वेळेत लागलेले नाहीत. त्यामुळे अखेर आता मुंबई विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाची मदत घेतलीय.
मुंबई विद्यापीठाचे पेपर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात तपासले जाणार आहेत. सुमारे २ लाख पेपर नागपूर विद्यापीठात तपासले जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मिळून ४७७ परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील केवळ ५१ परीक्षांचे निकाल वेळेत लागलेत. इतर परीक्षांचे निकाल अद्याप लागू शकलेले नाहीत.