मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवन परिसरात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा अभिजात आहेच. त्या भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही. केवळ एक दिवसच नाही तर आयुष्य मराठीमय व्हावं अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.
मराठी जिंजाऊंचे संस्कार असलेली भाषा असून मराठीचं वाकडं करण्याची कुणाची हिंमत नसल्याचंही यावेळी ते म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त भाषण करताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली. पण ही मागणी करताना नाना पटोले यांनी गोंधळ घातला. अभिजात मराठी असं म्हणण्याऐवजी नाना पटोले अभिजात मराठी असं म्हणाले. एकदा नाही तर दोनवेळा नाना पटोलेंनी ही चूक केली.