धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण बॉडी बिल्डर होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

आकाश नेटके | Updated: Sep 5, 2023, 11:44 AM IST
धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : नालासोपाऱ्यात (Nalasopara) एका 27 वर्षीय बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अजिंक्य कदम असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या 27 वर्षीय बॉडी बिल्डरचे नाव आहे. अजिंक्य कदम हा नालासोपारा पूर्व येथील मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. सोमवारी सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

नालासोपाऱ्यात 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 27 वर्षीय अजिंक्य कदम सोमवारी घरी असताना छातीत दुखू लागल्याने तो अस्वस्थ झाला होता. त्यामुळे अजिंक्यला तातडीने जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराआधीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..

अजिंक्य हा अविवाहित होता. अजिंक्यने 75 किलो वजनी गटात बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली होती. अजिंकच्या पश्चात आई-वडील तीन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. त्याच्या अशा अनपेक्षित जाण्याने त्याच्या मित्र परिवारासह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.