2030 पर्यंत मुंबई शहर आंनदी करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार

मुंबईचं स्पिरीट जपणारा मुंबईकर

Updated: Feb 8, 2020, 10:24 AM IST
2030 पर्यंत मुंबई शहर आंनदी करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार  title=

मुंबई : मुंबईकरांनो तुम्ही खरंच आंनदी आहात का ? कारण आता मुंबई महापा लिकेनं मुंबईकरांना अधिक खूश ठरवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका नक्की काय करणार आहे आणि मुंबईकर सध्या तरी या शहरात आनंदी आयुष्य जगतात का ? 

मुंबईकर... जिंदादिल मुंबईकर.... मुंबईचं स्पिरीट जपणारा मुंबईकर.... याच मुंबईकरांना आणखी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न आता मुंबई महापालिका करणार आहे. केंद्र सरकारकडून मुंबईला नामांकन मिळालंय. त्यासाठी महापालिकेनं एक सर्वेक्षण हाती घेतलंय. 2030 पर्यंत मुंबई शहर आंनदी करण्याचा निर्धार महानगरपालिकेनं केला आहे

 मुंबईकर आंनदी आहेत मात्र त्यांच्या आनंदामध्ये अधिक वाढ झाली पाहिजे. दुबई, भूतानमध्ये happy index काढला जातो. त्याप्रमाणे आता मुंबईकरांचा happy index काढला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया  पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, आदित्य ठाकरेंनी दिली आहे. 

सर्वेक्षणात मुंबईकरांना वेगवेगळे 24 प्रश्न विचारले जाणार आहेत. मुंबईची सार्वजनिक व्यवस्था, मुंबईतील प्रवास, मुंबईत घरं घेणं परवडत का ?, आरोग्य सेवा, कचरा संकलन, शिक्षण, याबद्दल मुंबईकरांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मायानगरी मुंबईत राहणऱ्या नागरिकांच्या आनंदी आयुष्याची व्याख्या आहे तरी काय आणि मुंबईकर खरंच या शहरात आनंदाने जगतात का हे या निमित्तानं समोर येईल.

दरम्यान मुंबईतील रेल्वेचा यातनादायी प्रवास, वाहतूक कोंडी, न परवडणारी घरं, वाढत प्रदूषण आणि अस्वच्छता या प्रमुख समस्यांचा सामना सामान्य मुंबईकर रोज करत असून किमान या समस्या काही अंशी जरी सोडवल्या तरी सामान्य मुंबईकर किमान समाधानानं या मायनगरीत जगू शकेल आणि याची जाणीव राज्यकर्त्यांनाही नक्कीच असेल.