टीव्ही अभिनेत्रीसोबत बलात्कार, फेसबुक मैत्री पडली महागात

 लग्नाचं आमिष दाखवून दुष्कृत्य केल्याचा आरोप केलायं.

Updated: Sep 23, 2018, 08:55 AM IST
टीव्ही अभिनेत्रीसोबत बलात्कार, फेसबुक मैत्री पडली महागात  title=

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीने 25 वर्षांच्या तरुणावर लग्नाचं आमिष दाखवून दुष्कृत्य केल्याचा आरोप केलायं. याप्रकरणी मुंबईतील ओशीवरा पोलीस ठाण्यात एक झीरो एफआयआर बुधवारी दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीला समन्स पाठविण्यात आले असून पीडितेला पुढील चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. या दोघांकडूनही याप्रकरणी कोणते प्रतिक्रिया आली नाही.

पीडितेची तक्रार 

सोशल मीडियाच्या माध्यमातून टेलीव्हिजन अभिनेत्रीची मैत्री कानपूरच्या एका तरुणाशी झाली. एएनआयने दिेलेल्या वृत्तानुसार, त्यांनी फेसबुक चॅटच्या माध्यमातून एकमेकांचा नंबर घेत चॅटींग सुरू केली आणि लग्नाचा निर्णय घेतला. या युवकाने शाजापुर, लखनऊ, दिल्ली आणि नीमरानासारख्या ठिकाणि फिरण्याची योजना बनवली. दोघेही एकत्र फिरल्याची माहिती नीमराणा पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय पुनिया यांनी दिली. फिरताना पीडितेची बहीणही या दोघांसोबत सोबत होती.

हॉटेलमध्ये बलात्कार ?

 2014 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना या अभिनेत्रीची फेसबुकवरून युवकाशी ओळख झाली होती.याचे घट्ट मैत्रीत रुपांतर झाले आणि त्यांनी भेटायचा निर्णय घेतला. युवकाला भेटण्यासाठी ही अभिनेत्री मुंबईहून दिल्लीने एअरपोर्ट येथून थेट नीमराना फोर्ट पोहोचली. इथे रुम न मिळाल्याने राष्ट्रीय राजमार्ग 8 च्या ग्रॅंड तारा हॉटेलमध्ये गेले. तिथे आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून रेप केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.