गोवंडीतील ऑरेंज मिंट या हॉटेलमध्ये गोळीबार

गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑरेंज मिंट या हॉटेल मध्यरात्री  गोळीबार झाला.

Updated: Jun 9, 2018, 09:23 PM IST

गोवंडी : सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑरेंज मिंट या हॉटेल मध्यरात्री  गोळीबार झाला. या गोळीबारात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. जुन्या गाडीचे पैसे न दिल्याच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. राकेश सोनावणे व श्वेता पांडे यांनी जतीन अहुजा कडून जुनी गाडी खरेदी केली होती. मात्र त्याचे पॆसे दिले नाहीत म्हणून ज्या ठिकाणी राकेश आणि श्वेता यांची वाढदिवसाची पार्टी सुरु होती त्या हॉटेल मध्ये जाऊन हवेत गोळीबार केला. त्याठिकाणाहून राकेश आणि श्वेता यांनी पळ काढला त्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पोलिसांनी जतीन अहुजा आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केलीयं.