मुंबई : विधानसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यानुसार महायुतीला पुन्हा यश मिळताना दिसत आहे. मुंबईत दहीसरमधून मनिषा चौधरी आणि बोरीवली भाजपा उमेदवार सुनील राणे हे विजयी झाले आहेत. 'अब की पार दोनशे पार' ही घोषणा महायुतीने केली. तर 'अबकी बार शंभर पार' ही घोषणा शिवसेनेने शिवसैनिकांना दिली. या अपेक्षित निकालाच्या आसपास महायुती पोहोचली नसली तरी सत्तेजवळ पोहोचण्याच्या तयारीत आहे. मुंबईमध्ये महायुतीला समाधानकारक यश मिळाले आहे.
वरळीतून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विजयी
चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी, काँग्रेसच्या नसीम शेख यांचा पराभव. नसीन खान हे चार वेळा आमदार राहीले आहेत.
शिवडी मतदार संघातून शिवसेनेचे अजय चौधरी यांचा विजय झाला आहे.
चारकोप विधानसभेचे भाजपा उमेदवार योगेश सागर हे विजयी झाले आहेत.
माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी
मागाठाणे विधानसभा शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे विजयी
दिंडोशी मतदार संघात शिवसेनेचे सुनील प्रभु विजयी
जोगेश्वरी मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत.
विक्रोळी मतदार संघाचून सुनील राऊत विजयी
घाटकोपर पूर्व येथून भाजपाचे पराग शाह विजयी
बोरीवलीतून सुनील प्रभू विजयी झाले आहेत.