कोरोनानंतर लहान मुलं 'या' गंभीर आजाराच्या विळख्यात

मुंबईमध्ये कोरोनानंतर अजून एका रोगाने डोकं वर काढलंय. मुख्य म्हणजे लहान मुलांमध्ये याच प्रमाण जास्त आहे. 

Updated: Feb 13, 2022, 09:06 AM IST
कोरोनानंतर लहान मुलं 'या' गंभीर आजाराच्या विळख्यात title=

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनानंतर अजून एका रोगाने डोकं वर काढलंय. मुख्य म्हणजे लहान मुलांमध्ये याच प्रमाण जास्त आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये बालकांमध्ये टीबी म्हणजेच क्षयरोगाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. जवळपास 44 टक्क्यांनी हे प्रमाण वाढलं असल्याची माहिती आहे. 

मुंबईमध्ये टीबी फोफावत असून आता लहान मुलांना देखील याची लागण होताना दिसतेय. हे प्रमाण 2018 पासून वाढतंय. बाधित बालकांचं प्रमाण 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 52 टक्क्यांनी वाढलंय. मुख्य म्हणजे औषधांना दाद देणाऱ्या (डीएस) टीबीसोबतच आता ड्रग रेझिस्टंट- डीआर म्हणजे औषधांना दाद न देण्याऱ्या टीबीच्या प्रमाणात वाढ झालीये.

  • 2018 साली 5 हजार 389 लहान मुलांना टीबीची लागण झाली होती 
  • 2018 मध्ये 3 हजार 936 बालकांना डीएस, तर 453 बालकांना डीआर टीबीची लागण झाली होती
  • 2019 मध्ये यात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होऊन 4 हजार 462 पर्यंत जाऊन पोहोचली आहे

टीबीची लागण झालेल्या बालकांचं प्रमाण 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 52 टक्क्यांनी वाढलं. 2021 मध्ये 5 हजार 419 मुलांना टीबी असल्याचं समोर आलं. यामध्ये 4 हजार 763 मुलांना डीएस तर 653 मुलाना डीआर टीबीची बाधा झाल्याचं आढळलं.

लहान मुलांमध्ये टीबीची लक्षणं

  • दीर्घकाळ खोकला 
  • ताप येणं
  • वजन न वाढणं किंवा कमी होणे
  • खाण्याची इच्छा कमी होणं
  • डोकेदुखी, पाठदुखी
  • उलटय़ा होणं
  • लिम्फनोडला सूजणं 
  • रात्रीच्या वेळी घाम येणं