बोर्डाच्या परिक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांची थेट सुप्रीम कोर्टात धाव

अजूनही बोर्डाचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. 

Updated: Feb 13, 2022, 08:31 AM IST
बोर्डाच्या परिक्षा रद्द करा; विद्यार्थ्यांची थेट सुप्रीम कोर्टात धाव title=

मुंबई : बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना विद्यार्थी ऑफलाईन परिक्षा घेण्याबाबत संमत नाहीत. अजूनही बोर्डाचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. विविध बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीये.

SSC,HSC,CBSE,ISCE,NIOS या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान बोर्डाचे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही आहेत. आता या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत हे पाहणं महत्वाचं आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ऑफलाइन परीक्षांऐवजी मुल्यांकनाच्या पर्यायी पद्धतीची मागणी करण्यात आली आहे.

सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य मत याबाबत माहिती दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेनंतर हा संभ्रम दूर झाला. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. मात्र विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेसाठी तयार नसून त्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.