मुंबईतली टॅक्सी आता 'अॅप'वर

मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी टॅक्सीही आता मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बुक करता येणार आहे.

Updated: Jun 29, 2017, 06:57 PM IST
मुंबईतली टॅक्सी आता 'अॅप'वर title=

मुंबई : मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी टॅक्सीही आता मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बुक करता येणार आहे. टॅक्सीमेन्स युनियन आणि टॅक्सी असोसिएशन या दोन प्रमुख खासगी टॅक्सी संघटनांनी त्यासाठी 'आमची ड्राईव्ह' नावाचे खास अॅप्लिकेशन सुरू केलं आहे.

रवींद्र नाट्य मंदिरात गुरूवारी झालेल्या कार्यक्रमात ही अॅप सेवा सुरू करण्यात आली. या नव्या सुविधेमध्ये टॅक्सी सेवेसाठी नेहमीचाच दर आकारला जाईल. मात्र अॅप सेवेसाठी ग्राहकांकडून जादा पाच रुपये वसूल करण्यात येतील. सध्या या सेवेसाठी 3 हजारापेक्षा जास्त टॅक्सीचालकांनी नोंदणी केली असून, तूर्तास मुंबई शहर आणि उपनगरातच ही सेवा उपलब्ध असेल.