मुंबईत अग्नितांडव, 6 जणांचा बळी

मुंबईतील ताडदेव परिसराती भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला भीषण आग लागली. 

Updated: Jan 22, 2022, 01:15 PM IST
मुंबईत अग्नितांडव, 6 जणांचा बळी title=

मुंबई : मुंबईत शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मुंबईतील ताडदेव परिसराती भाटिया हॉस्पिटलजवळील 20 मजली इमारतीला भीषण आग लागली. 18 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. आतापर्यंत 15 जण आगीच्या विळख्यात सापडले आहेत. सर्वांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबईच्या आपात्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

नायर हॉस्पिटलचे डॉ. कोल यांनी सांगितलं की, भाजलेल्या 4 जणांना रूग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जणांची प्रकृती स्थिर आहे. 

रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळालेल्यांपैकी 12 जणांना जनरल बर्न वॉर्डमध्ये, तर 3 जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

यावेळी घटनास्थळाची माहिती घेतलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, भाटिया रुग्णालयात रूग्णांना भरती केलं आहे. जवळच्या रुग्णालयात बेड्स रिकामी ठेवण्यास सांगितलंय. या इमारतीतून लोकांना बाहेर काढलं जातंय. बचाव पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

नाना चौक गवालीया टॅंक इथल्या कमला इमारतीला आग लागली होती. सकाळी 7.30 च्या सुमारास ही आगीचा भडका उडाला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकर पोहोचले होते