मुंबई : मुंबईजवळ असलेल्या बुचर बेटावर असलेल्या तेलसाठ्याला अचानक आग लागली आहे.
बुचर बेटावर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्यांना ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आलं. आगीच्या वृत्ताला मुंबई पोर्ट ट्रस्टने दुजोरा दिला आहे.
सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. १३ आणि १४ क्रमांकाच्या टँकेला आग लागली. या दोन्ही टँकची क्षमता जवळपास १० ते १५ लिटर आहे.
ही आग इतकी भीषण होती की आग गेट वे ऑफ इंडियापासूनही दिसत होती. गेट वे ऑफ इंडियापासून बुचर बेट हे जवळपास ८ किलोमीटर दूर आहे.