मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार इथल्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी आलेल्या राईट टू पीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
शहरात शौचालय नसल्याचा निषेध करण्यासाठी या महिला आल्या होत्या. मात्र पूर्वनियोजित परवानगी न घेतल्याने पोलिसांनी या आंदोलक महिलांना ताब्यात घेतलंय.
शौचालय दिनानिमित्त आम्ही कशाचे लाभार्थी आहोत हे मुख्यमंत्र्यांना सांगायचे होते असे या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. पण पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकले.