Mumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी

Mumbai Rain : मंगळवारी रात्री उशिरापासूनच शळहरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळं त्याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 19, 2023, 03:56 PM IST
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र) Mumbai Rain updates trains cancelled due to heavy rain in the city

Mumbai Rain : Mumbai Rain : हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी सकाळपासून, किंबहुना मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये आणि राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळालं. बुधवारची सकाळच ओलिचिंब झाल्यामुळं नोकरीसाठी निघालेल्या अनेकांनाच बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आणि पाहता पाहता मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनवरही या पावसाचे थेट परिणाम पाहायला मिळाले. 

 

मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. मुंबई विभागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुंबई- पुणे किंवा पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांनी रदद् केलेल्या ट्रेनची यादी पाहूनच पुढील सूचनांची प्रतीक्षा करत प्रवासाची आखणी करावी असं आवाहन यंत्रणा करत आहेत. 

कोणत्या ट्रेन रद्द?

1)  डेक्कन क्वीन- 12123 सीएसएमटी-पुणे 19.7.23  आणि12124   पुणे-सीएसएमटी 20.7.23
2) सिंहगड एक्सप्रेस- सीएसएमटी -पुणे 19.07.23 आणि 11010 पुणे-सीएसएमटी20.07.23 
3) डेक्कन एक्स्प्रेम- पुणे-सीएसएमटी  19.07.23  आणि 11007 सीएसएमटी-पुणे 20.07.23 
4) इंटरसिटी- पुणे-सीएसएमटी 19.07.23 आणि 12127 सीएसएमटी-पुणे  20.07.23 
5) इंद्रायणी- पुणे-सीएसएमटी 19.07.223  आणि 22105 सीएसएमटी-पुणे 20.07.23

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : मुंबई लोकलसेवा विस्कळीत; कोसळधारीमुळं कोकणात पूरपरिस्थिती 

मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे पावसामुळं विस्कळीत झालेली असतानाच पश्चिम रेल्वेवर मात्र चित्र फारसं क्लेशदायक नव्हतं. कारण, पश्चिम रेल्वे काही अपवाद वगळता निर्धारित वेळापत्रकानुसारच धावत होती. इथं कल्याण कर्जत रेल्वे वाहतुक मात्र काही काळासाठी ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. ज्या धर्तीवर पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला. परिणामी कल्याण स्थानकाह प्रचंड प्रवासी अडकून राहिले. 

अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने अंबरनाथ ते कर्जत ही रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. तर, सीएसएमटीच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेनही धीम्या गतीनं सुरु असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पावसामुळं रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांकडून मनस्ताप व्यक्त केला जात असून शासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी करताना दिसत आहेत. 

फक्त रेल्वे सेवाच नव्हे, तर मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पश्चिम उपनगरांमध्येही काही भागांना पावसानं झोडपलं असून, अनेक भाग जलमय झाले आहेत. तर, बदलापूर, नेरळ भागांमध्ये पाणी साचल्याचं वृत्त समोर आलं आहे.