Mumbai Railway MegaBlock : रविवारी या रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या

Mumbai Railway MegaBlock : रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Jul 2, 2022, 11:38 PM IST
Mumbai Railway MegaBlock : रविवारी या रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक, प्रवासाआधी जाणून घ्या title=

मुंबई :  रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत (Mumbai Railway MegaBlock) महत्त्वाची बातमी आहे. रविवारी 3 जुलैला मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 2 मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.  मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील एका स्थानकावर पादचारी पूलाचं (Badlapur Station Foot Ober Bridge) काम सुरु आहे. या पुलासाठी रेल्वेकडून गर्डरचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात आला आहे. (mumbai railway megablock on central and harbor railway tomorrow 3rd July 2022)

बदलापूर स्थानकात 6 मिटर रुंदीच्या पादचारी पूलाचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.  सकाळी 10.50 ते दुपारी 1.10 पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधी दरम्यान कल्याण ते बदलापूर मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची काही तास गैरसोय होणार आहे.   

सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरही मेगाब्लॉक

तर सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दोन्ही धीम्या मार्गावर एकूण 4 तास हा ब्लॉक असणार आहे.  सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत हा ब्लॉक असेल. या कालावधीत धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावरुन चालवण्यात येईल. तसेच पनवेल- वाशी अप आणि डाउन या दोन्ही मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असेल.