मुंबई : ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेनं मुंबई पोलिसांकडे अर्ज केलाय.
मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशन हा मोर्चा निघणार आहे. सकाळी साडे अकराला मोर्चाची वेळ असेल... पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.
रेल्वे समस्यांबाबत आपला राग व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आलंय. मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेनं मुंबई, ठाणे, पुणे नाशिकमधली पक्षाची ताकदही लावणार आहेत.
दरम्यान, एल्फिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रवाशांच्या समस्यांना आवाज देण्यासाठी मनसेतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकल रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी प्रवासी महासंघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. प्रवासी संघटनांनी राज ठाकरेंकडे तक्रारींचा पाढाच वाचला.