मुंबई : देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त करण्यात आला . याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या गांजा व्यवसायात राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पियो गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गाडीवर पत्रकार असं लिहीण्यात आलं आहे.
देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टीत काही इसम हे गांजा विक्री करतात अशी माहिती देवनार पोलिसांना खबऱ्या कडून मिळाली असताना पोलिसांनी एक पथक तयार करून या झोपडपट्टीजवळ सापळा रचून छापा टाकला. त्याठिकाणी आरोपी सोहेल रतन सय्यद उर्फ सुनील रतन निकम याने भाड्याने घेतलेल्या खोलीत 5 जण छोट्या छोट्या पाकिटात गांजा भरत असल्याचं निदर्शनास आलं.
तसेच आरोपी सय्यद यांच्या स्कॉर्पियो जीपची झडती घेतली असता त्यातही गांजा आढळला.पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३७ किलो गांजा आणि जीप तसेच सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल आणि गांजा विक्रीतून जमा झालेले ६२ हजार रुपये आणि अंदाचे सात लाख रुपये किमतीची जीप असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विकणे अश्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.