नवी दिल्ली : मुंबई पोलीस दलातले सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश जोशी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. दिनेश जोशी यांच्या ३२ वर्षांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१२ मध्येही दिनेश जोशी यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते. दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल, पोलीस दलात विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या दिनेश जोशी यांनी आनंद व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तीन ज्येष्ठांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेत. भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार हजार झालाय. तर सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झालंय. तर आसामचे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नेते नानाजी देशमुख (मरणोत्तर) आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते असल्याचे म्हटले. भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील इतिहासकार शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना 'पद्म विभूषण' तर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा 'पद्म भूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवकालीन इतिहासाचे संशोधन आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वेचले. शिवकालीन इतिहासावर त्यांनी लिहलेली पुस्तके चांगलीच गाजली होती. त्यांच्या लेखणीतून उतरलेले 'जाणता राजा' हे नाटकदेखील रंगभूमीवर तुफान लोकप्रिय झाले होते. त्यांच्या याच कार्याचा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यापूर्वी राज्य सरकारने २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता.
वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असलेले डॉ. अशोक कुकडे हे आरएसएसच्या विविध पदावर कार्यरत आहेत. विवेकानंद प्रतिष्ठान आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते वृद्धांची सेवा करत आहेत. ते मूळचे पुण्याचे असून त्यांचे वास्तव्य हे लातूरमध्ये आहे. पुण्यातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. कुकडे यांनी गरीब लोकांसाठी काम सुरु केले. पुण्यात मागास आणि गरिब लोकांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले.