मुंबई : मुंबईची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच असल्याचं आता आकडेवारीनं सिद्ध झालं आहे. जगातल्या सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई ४५ व्या स्थानी तर दिल्ली ५२ व्या स्थानी आहे. टोक्यो सुरक्षित शहरांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तर सिंगापूर दुसऱ्या स्थानी आहे. जपानच्याच ओसाका शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे. रंगून, कराची, ढाका ही शहरं या यादीत तळाशी आहेत.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने गुरूवारी आपला अहवाल जारी केला. डिजीटल सुविधा, आरोग्य, सुरक्षा या निकषांवर हे मानांकन देण्यात आलं आहे. २०१७ च्या अहवालात देखील टोकियो अव्वल स्थानी होता. पण दिल्लीचा मात्र घसरण झाली आहे. दिल्ली ४३ व्या स्थानावरुन ५२ व्या स्थानी पोहोचलं आहे. मुंबईने मात्र ४५ वा क्रमांक कायम राखला आहे.
ऑस्ट्रेलियामधील सिडनी हे शहर पांचव्या आणि तर कनाडामधील टोरंटो हे शहर सहाव्या स्थानी आहे. लंडन हे शहर १४ व्या स्थानी आहे. कुआलालंपुर ३५ व्या स्थानी, इस्तांबुल ३६ व्या स्थानी आणि मॉस्को ३७ व्या स्थानी आहे. भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमधील कराची ५७ व्या स्थानी तर बांगलादेशमधील ढाका हे ५६ व्या स्थानी आहे.