मुंबई : मुंबईत कोरोनाचा आलेख कमी होत चालला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वीस हजारांच्यावर गेलेला रुग्णसंख्येचा आकडा, आता हजारापर्यंत आला आहे. सोमवारी मुंबईत एक हजाराहुन कमी रुग्ण आढळले. यापार्श्वभूमीवर निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
निर्बंधात मोठ्या प्रमाणावर सूट
मुंबईतील रात्रीची जमावबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकाद नाईट लाईफ सुरु होणार आहे.
याशिवाय टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, समुद्र किनारे, गार्डन, पार्कही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मैदानी खेळांना क्षमतेच्या २५ टक्केपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. स्विमिंग पुल, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु राहाणार आहे.
रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार, लग्नकार्यात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० जणांना परवानगी,
तर भजन, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे.