Mumbai News : उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही! मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट

Mumbai lake water Level : चैत्र महिन्याला सुरुवात होते. त्यापूर्वीच राज्यात उष्णेतीची लाट आली आहे. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे त्रास होतोय. अशात मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 8, 2024, 08:46 PM IST
Mumbai News  : उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही! मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट title=
Mumbai News Water scarcity crisis in the state including Mumbai seven lakes have 27 percent water storage

Mumbai lake water Level : राज्यात कुठे वादळी वाऱ्यासह गारपीट तर कुठे उष्णतेची लाट, त्यामुळे नागरिकांची हाल होत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे धरण परिसरातही परिणाम होतो आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. मुंबईला 7 धरणातून पाणी साठा करण्यात येतो आणि वाढता उन्हाच्या तडाख्यामुळे या धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यावर पाणी टंचाई ओढवण्याची शक्यता आहे, कारण 35 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा खाली घसरला आहे.  (Mumbai News Water scarcity crisis in the state including Mumbai seven lakes have 27 percent water storage)

मुंबईतील धरणात किती साठा बाकी?

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणी साठा करण्यात येतो. गेल्या वर्षी 7 एप्रिलला 36.76 टक्के पाणी साठी होता. मात्र यंदा हा आकडा 33.90 एवढा आहे. 

उर्ध्व वैतरणा धरणात 36.60 टक्के

तुळशीमध्ये 44.20 टक्के

मध्य वैतरणामध्ये 12.13 टक्के

मोडकसागरमध्ये 24.97 टक्के

भातसामध्ये 26.34 टक्के

तानसामध्ये 41.86 टक्के

विहारमध्ये 39.61

राज्यात सर्वात कमी पाणीसाठा 'या' भागात

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील धरणांतील पाणीसाठा हा 35.88 टक्के आहे. तर सर्वात कमी पाणीसाठी हा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 18.31 टक्के एवढा आहे. याचा अर्थ कडक उन्हाळा सुरु होण्यापूर्वी मे महिन्यापूर्वी मराठावाड्यावर दृष्काळाचं सावट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.