Mumbai News: मुंबईचे रस्ते, मुंबईतली गर्दी या साऱ्याविषयी कुतूहल वाटणारी मंडळी आता मात्र तसं म्हणताना दिसत नाहीत. कारण, हीच मुंबई वाहतूक कोंडीमुळं त्यांच्या प्रतीक्षेची परिसीमा पाहते. शहरात सुरु असणारी विकासकामं आणि बांधकामं या साऱ्यामुळं सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिक सातत्यानं सामोरे जात आहेत. त्यातच शहरातील चिंचोळ्या वाटांवरून पुढे जाताना दुपटीनं लागणारा वेळ या साऱ्यामध्ये भर टाकणारा.
शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर वाढलेली वाहनांची संख्या लक्षात घेता आता प्रशासनानंसुद्धा यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. परिणामी ऐन दिवाळीतच मुंबईकरांना एका नव्या आणि महत्त्वपूर्ण मार्गावर नव्या पर्यायाची शुभवार्ता मिळाली आहे. हा मार्ग आहे वर्सोवा विरार सागरी सेतू.
वर्सोवा विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार करण्यासाठीच्या हालचाली सध्या MMRDA नं सुरु केल्याची माहिती मिळत आहे. ज्यामुळं वरळी - वांद्रे, वांद्रे- वर्सोवा, वर्सोवा- विरार अशा टप्प्यांमध्ये या मार्गाचा विस्तार करण्यासंदर्भातील निर्णय एमएमआरडीएनं घेतले होते. याच टप्प्यांमध्ये आता विरार- पालघरचीही भर पडणार असल्याचे संकेत आहेत. ज्यामुळं आता सागरी मार्गाची उपलब्धता पाहता थेट नरिमन पॉईंटपासून वरळी आणि तिथून पालघरपर्यंतचा प्रवास सागरी सेतू मार्गानं करता येणार आहे.
सदरील घोषणेनंतर आता प्रत्यक्षात हालचाली करत या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूक प्रक्रियेसाठीच्या निविदाही नुकत्याच मागवण्यात आल्या. तेव्हा आता या मार्गाच्या कामाची सुरुवात केव्हा होणार आणि हा मार्ग नागरिकांसाठी केव्हा खुला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
वर्सोवा विरार सी लिंकचा थेट फायदा मढ आयलंड, गोराई बीच, आगाषशी रोड या भागांना होणार आहे. कारण हा मार्ग याच टप्प्यांवरून जोडला जाणारप आहे. मनोरी खाडीपूलही या मार्गाचाच भाग अलेल. प्राथमिक माहितीनुसार हा सी लिंक चार ठिकाणी जोडला जाणार आहे. चारकोप, मीरा भाईंदर, वसई- विरार अशा चार ठिकाणी हा मार्ग जोडला जाईल. किनाऱ्यापासून साधारण 1 किलोमीटरवर हा मार्ग असेल. ज्यावर गोराई, उत्तन, वसई आणि विरार असे चार टोल प्लाझा असतील.
वांद्रे- वर्सोवा मार्गाचं काम कुठवर पोहोचलं?
वांद्रे ते वर्सोवापर्यंतच्या 17 किमी लांबीच्या सी लिंकचं काम सध्या प्रगतीपथावर असल्याचं सांगण्यात येत आहे. 42.75 किमीचा हा मार्ग असल्याचं सांगितलं जात असून त्यासाठीचा खर्च 63424 कोटी रुपये इतका असेल. हाच मार्ग पुढे रस्तेमार्गानं विरार- पालघरपर्यंत जोडला जाईल.