मुंबई : मुंबई आणि ठाण्यात सर्व सामान्यांनी घरखरेदीकडे पाठ केल्यासारखं चित्र आहे. दसरा सणाच्या दिवशी बिल्डर्सकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन योजनांची घोषणा केली जाते. मात्र यावर्षी अशा सूट देणाऱ्या योजना, मागील वर्षाच्या तुलनेने कमी होत्या.
अनेक ठिकाणी ग्राहकांनी नवीन घर खरेदी करण्यासाठी चाचपणी केली, पण घराचं क्षेत्रफळ बिल्डर्सने सांगितल्यापेक्षा कमी होतं, त्यामुळे ते स्वस्त वाटत असलं तरी ते स्वस्त नव्हतं.
मुंबई आणि पुण्यात अनेक ठिकाणी घरं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी घराच्या किंमती या स्थिर आहेत.