घर खरेदीदारांसाठी खुशखबर, मुंबईत घरांच्या किंमतीत ५ टक्के घसरण

गेल्या वर्षी नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट(रेरा) आणि जीएसटी लागू झाल्याने घराच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. नाईटफ्रँक इंडिया रिअल इस्टेटच्या रिपोर्टनुसार देशभरातील शहरी भागांमध्ये साधारण तीन टक्के घसरण झाली.

Updated: Jan 11, 2018, 10:45 AM IST
घर खरेदीदारांसाठी खुशखबर, मुंबईत घरांच्या किंमतीत ५ टक्के घसरण title=

मुंबई : गेल्या वर्षी नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट(रेरा) आणि जीएसटी लागू झाल्याने घराच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. नाईटफ्रँक इंडिया रिअल इस्टेटच्या रिपोर्टनुसार देशभरातील शहरी भागांमध्ये साधारण तीन टक्के घसरण झाली.

पुण्यामध्ये घरांच्या किंमतीमध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांची घसरण तर आर्थिक राजधानी मुंबईत ५ टक्के घसरण झाली. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. घरांच्या किंमती घटण्याचे मुख्य कारण म्हणजे घसरलेली मागणी.

बंगळूरु, दिल्ली-एनसीआर आणि चेन्नईमधील घरांच्या विक्रींमध्ये २६,६ आणि २० टक्के घसरण पाहायला मिळाली. दरम्यान मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीमध्ये थोडी तेजी पाहायला मिळाली. रिपोर्टनुसार महाराष्ट्रात रेरा लागू झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील घरांच्या विक्रीमध्ये अनुक्रमे ३ आणि ५ टक्के वाढ झाली.

विक्री होत नसल्याने अनेक नव्या प्रोजेक्टच्या लाँचिगमध्येही घसरण झालीय. गेल्या वर्षी नव्या प्रॉजेक्टच्या लाँचिंगमध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये ५६ टक्के आणि बंगळूरुमध्ये ४१ टक्के घसरण झाली. 

बुधवारी नाईटफ्रँक इंडिया रिअल इस्टेटने सहामाही रिपोर्ट जाहीर केला. मुख्य अर्थतज्ञ तसेच नाईट फ्रँकचे समंतक दास म्हणाले, गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच असे झालेय की मुंबई महानगरात घरांच्या किंमतीत घसरण झालीये. यामागचे मुख्य कारण म्हणजे रिअल इस्टेटमधील अनेक नियम लागू होणे. यात रेरा हा कायदा महत्त्वाचा ठरतो.