Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे.  या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे. 

Updated: Feb 23, 2023, 01:29 PM IST
Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय title=

Mumbai Metro News : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. (Mumbai Metro) यासाठी एमएमआरडीएला 400 कोटी निधी देण्यात आला आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार हा निधी देण्यात आला आहे. एक टक्का मेट्रो उपकराच्या माध्यमातून राज्य सरकारकडे रक्कम जमा झाली आहे. त्यातील 400 कोटी रुपये नगर विकास विभागाने एमएमआरडीए आणि 60 कोटी रुपये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे. 

मुंबई, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या, पुण्यात पीएमआरडीएच्या, नवी मुंबईत सिडकोच्या, नागपुरात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, नागपूरच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. आता याला अधिक गती मिळणार आहे. 400 कोटी रुपये देण्यासंबंधीचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे.

वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी मुंबई, मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या, पुण्यात पीएमआरडीएच्या, नवी मुंबईत मेट्रो प्रकल्प राबविले जाते आहेत. या मेट्रो प्रकल्पांना राज्य सरकारने नागरी परिवहन प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. तसेच नगर विकास विभागाने डिसेंबर 2022 मध्ये पुणे मेट्रोसाठी 90 कोटी रुपये, तर नागपूर मेट्रोसाठी 50 कोटी रुपये दिले होते. आता जमा 460 कोटी रुपयांच्या रक्कमेचे वाटप करण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार यावेळी मुंबई मेट्रो आणि पुणे मेट्रोला प्राधान्य देण्यात आलेय.

सरकारच्या या निर्णयामुळे प्रकल्पाला अधिक गती मिळणार आहे. एमएमआरडीएकडून 337 किमीचे मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. यासाठी एमएमआरडीएला कोट्यवधींचा खर्च येतो आहे. अशा वेळी सरकारकडून मिळणारी ही रक्कम मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना अधिक चालना देईल, अशी अपेक्षा आहे.