मुंबई : पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री अधिका-यांपर्यंत सर्वांनीच आपापल्या गाड्यांवरून लाल दिवे काढले आहेत. मात्र मुंबईच्या महापौरांना लाल दिवा सोडवेना. गाडीवरून लाल दिवा काढणार नसल्याची भूमिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतलीय.
केंद्र आणि राज्य सरकार जोपर्यंत लाल दिवा न वापरण्याचा जीआर काढत नाही तोपर्यंत लाल दिवा काढणार नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं महापौर महाडेश्वर लाल दिव्याच्या चांगल्याच प्रेमात पडल्याचं दिसतंय.
आरटीओने दिलेल्या नोटीसनुसार जर शासन आदेश असेल तर पालिका प्रशासनाने तो दिवा काढावा. परंतु शासन आदेश किंवा न्यायालयीन आदेश नसेल तर प्रशासन लाल दिवा काढणार नसल्याचं स्पष्ट केलंय.