मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

 महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Updated: Jan 6, 2021, 12:39 PM IST
मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. २१ डिसेंबरला मनपा मुख्यालयात महापौरांना धमकीचा हा फोन आला. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत महापौरांना जीवेमारण्याची धमकी दिली. या बाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीचा शोध सुरू आहे. 

माझ्या पीएच्या मोबाईलवर फोन आला. त्यावर अर्वाच्य भाषेत समोरुन शिव्या येत होत्या. नंतर कार्यालयाच्या लॅण्डलाईनवर फोन आला. यासंदर्भात संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांनी तक्रार देण्यास सांगितल्याचे महापौरांनी सांगितले.