Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.

नेहा चौधरी | Updated: Nov 15, 2023, 04:29 PM IST
 Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म title=
mumbai local trian video old lady delivery of pregnant woman video viral on Internet trending news

Mumbai Local Train Video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये लाखो व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यात महिला डब्यातील महिलांचे हाणामारी व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. पण सध्या सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील एक सुंदर क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्त्री सृष्टीची शक्ती, जननी आहे. ती कुठल्याही परिस्थिती सामना मोठ्या धैर्याने आणि ऊर्जेने करते. श्री स्वामी समर्थ म्हणतात अशक्य ही शक्य करतील...अशीच परिस्थिती धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका गरोदर मातेवर ओढवली. (mumbai local trian video old lady delivery of pregnant woman video viral on Internet trending news)

संसाराची तुच जननी!

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील dhanashree_ulhas_raje_ या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात लेकीने आईचं कौतुक करणारा क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवसापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात त्या लेकीने सांगितलं की, ''आज पहाटे  माझ्या आईने लोकल ट्रेमध्ये delivery केली ते ही सोबत कोणतीही साहित्य नसता हे सुखरुप पणे पार पडले तिला मदत करणारे काही महिलाचे व माझ्या आईचे खूप कौतुक''

या महिलेचं सोशल मीडियावर खूप कौतुक होतं आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये कुठलंही साहित्य नसताना महिलेची प्रसुती करणं हे काही खायची गोष्ट नाही. लेकीला आपल्या आईचा अभिमान आहे. या वृद्ध महिलेने धावत्या ट्रेनमध्ये दुसऱ्या आईला केलेली मदत प्रत्येकाच्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे. 

म्हणूनच म्हणतात आई ही आई असते, जगाच्या पाठीवर ती कुठेही असो...दिवाळीच्या आनंदात मातृत्वाचा हा सोहळा प्रत्येकाला आनंद देतोय. गरोदर महिला चेकअपसाठी हॉस्पिटलला जात असताना तिला धावत्या ट्रेनमध्ये प्रसुती वेदना सुरु झाल्यात. अशा परिस्थिती त्याच ट्रेनमध्ये उपस्थितीत असलेल्या एका वृद्ध महिला मदतीसाठी धावली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने हिम्मतीने लोकल ट्रेनमधील इतर महिलांच्या मदतीने त्या महिलेला मातृत्त्वाचं दिवाळी गिफ्ट दिलं. मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत संकटात जेव्हा एकमेकांसाठी उभे राहतात तेव्हा ते अशक्य शक्य करतात. दरम्यान बाळ आणि बाळंतिण सुखरुप आहेत.