मुंबई लोकलच्या वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार बदलणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईकर लोकल (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईकरांना (Mumbai) सोयीचे आणि हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील, असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेत.  

Updated: Feb 2, 2021, 04:39 PM IST
मुंबई लोकलच्या वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार बदलणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे title=

मुंबई : मुंबईकर लोकल (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईकरांना (Mumbai) सोयीचे आणि हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील, असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेत. तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा कालपासून ((Mumbai Local Trains)  सर्वांसाठी खुली झाली. सध्या सर्वसामान्य मुंबईकरांना सकाळी 7 ते 12 संध्याकाळी 4 ते रात्री 9 यावेळी लोकलनं प्रवास करायला मनाई आहे. पण ऑफिसही त्याच वेळी असल्यानं लाखो मुंबईकरांना लोकलप्रवासाऐवजी गर्दीतून इतर वाहनातून प्रवास करावा लागतोय. पण आता लोकल प्रवासाच्या वेळा पुन्हा बदलणार असल्याचे संकेतच आरोग्यमंत्र्यांनी दिलेत. (Mumbai Local Trains Timings Will Be Changed As Per Convenience Of People - Health Minister Rajesh Tope)

मुंबईची लाईफ लाईन असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक सेवा कालपासून सर्वसामान्य जनतेसाठी सुरू झाली. मात्र, लागू करण्यात आलेल्या वेळा सोयीच्या नसल्याने पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेताना तीन टप्प्यांत प्रवासाचे निर्बंध घातले आहेत. मात्र, त्याचा उलटा परिणाम दिसून येत आहे. वेळेच्या मर्यादा घालूनही गर्दी कायम आहे. तसेच, सुमारे 25 लाख चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचणे अजूनही अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली. मुंबईकरांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच बदल करण्यात येतील. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. 'लोकल सेवा' ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मुंबईकरांची सोय लक्षात घेऊन वेळेच्या बाबतीत काही करता येत असेल तर ते नक्की केले जाईल, असे टोपे म्हणाले. त्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल. शेवटी सरकारसाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.