Mumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी

Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा.... 

सायली पाटील | Updated: Jun 24, 2023, 09:58 AM IST
Mumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी title=
Mumbai Local news sunday Megablock new time table and latest updates

Mumbai Local News : मुंबई म्हटलं की, या शहरामध्ये येणारे गर्दीचे लोंढे, पर्यटकांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हे शहर पाहिल्यानंतर दिसणारा आनंद, इथल्या वास्तू आणि अर्थातच इथली लोकल सर्वांनाच आकर्षित करते. मुंबईत आल्यानंतर एकदातरी रेल्वेनं प्रवास करा असं सांगणारेही तुम्हाला भेटतील. पण, याच रेल्वे प्रवासाला रविवारी ब्रेक लागणार आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या प्रवासावर होणार आहे.

थोडक्यात रविवारच्या दिवशी मुंबईच्या रेल्वे प्रवासाला ब्रेक लागणार असून, कुठे भटकंतीसाठी निघायचं असल्यास या दिवसाला अनुसरून आधीच बेत आखून ठेवा अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. थोडक्यात रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक असून, मध्य आणि हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं नेमकी रेल्वेसेवा कशी प्रभावित होईल आणि रेल्वेच्या वेळांमध्ये नेमके कोणते बदल असतील हे पाहून घ्या... 

का घेतला जाणार आहे मेगा ब्लॉक?

विविध अभियांत्रिकी, देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यासाठी मुंबई लोकलवर 25 जून 2023 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  यामुळं माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.5 वाजल्यापासून दुपारी 3.55 पर्यंत हा ब्लॉक सुरु असेल. ज्यामुळं (CSMT) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी 10.15 ते दुपारी 3.18 या वेळेत धावणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर  थांबतील.  पुढे मुलुंड स्थानकावरून त्या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या एकंदर प्रवासात साधारण 15 मिनिटांनी उशीर अपेक्षित आहे. 

हेसुद्धा वाचा : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा

 

पुढे ठाण्यातून सकाळी 10.58 पासून ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि  माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि त्या पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

हार्बर मार्गावर काय परिस्थिती? 

हार्बर मार्गावर कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ज्याअंतर्गत सीएसटीहून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळात पनवेल/बेलापूर/वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. तर, वाशी/बेलापूर/पनवेलहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद असतील.