मुंबईतलं एक अनोखं कॅफे, तुम्ही या कॅफेला एकदा भेट द्याचं

मुंबईत अनेक आकर्षक कॅफे उभारण्यात आले आहेत, मात्र 14 स्पेशल दिव्यांग चालवत असलेले अर्पण कॅफे या सर्वांत भाव खाऊन जाते.

Updated: May 31, 2022, 09:54 PM IST
मुंबईतलं एक अनोखं कॅफे, तुम्ही या कॅफेला एकदा भेट द्याचं  title=

रुचा वझे, झी मीडिया मुंबई : मुंबईत अनेक आकर्षक कॅफे उभारण्यात आले आहेत, मात्र 14 स्पेशल दिव्यांग चालवत असलेले अर्पण कॅफे या सर्वांत भाव खाऊन जाते.मुंबईच्या जूहू परीसरात हे कॅफे उभारले आहे. कॅफेच्या हेड शेफ पासून ते डिष सर्व्ह करण्यापर्यत सर्व स्टाफ हा दिव्यांग असून या कर्मचाऱ्यांची अनेक मुंबईकरांनी अनुभवली असून, अनेकांच्या पसंतीचे हे कॅफे ठरतेय. 

यश चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आशया महाजन यांनी तीन वर्षापूर्वी 'अर्पण कॅफे' ची सुरूवात केली होती. दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे व त्यांच्यात हाच आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या कॅफेची सुरुवात करण्यात आली आहे. या कॅफेत कामे करण्यासाठी मुलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना जे काम शक्य आहे त्यांना त्यांना ते काम वाटून देण्यात आले आहे. त्यामुळे कोणी भाजी चिरतो, डिश सर्व्ह करतो, तर कोणी हेड शेफ आहेत. प्रत्येक कर्मचारी आपली भूमिका चोख बजावत अर्पण कॅफे चालवत आहे. 

आशया महाजन या कॅफेबाबत सांगतात की, 'या सर्व मुलांना आम्ही ट्रेनिंग देतो, त्यांना पगार देतो त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो. ही स्पेशल मुलं नाहीत तर आमचे टीम मेंबर्स असल्यासारखे आम्ही एकत्र मिळून काम करतो. आज हे कॅफे सुरू होऊन 3 वर्ष झाली आहेत. 

अनेक कुटुंबातून आम्हाला फोन येतात, आमच्या मुलांना इथे काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे हे ऐकून खुपच आनंद होतो, लवकरच आम्ही आणखी शाखा सुरू करू आणि जास्तीत जास्तीत मुलांना संधी देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

तसेच जुहू इथल्या कॅफे अर्पणला जास्तीत जास्त मुंबईकरांनी भेट देऊन कॅफेचा आनंद लुटावा तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवावा, असेही आशया महाजन यांनी सांगितले आहे.