मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाची दूरवस्था म्हणजे मागील सरकारचे पाप आहे, अशी टीका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी केली. ते शुक्रवारी मुंबईतील एका बैठकीच्यावेळी बोलत होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांची माहितीही दिली. महाराष्ट्रात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस आणि इंदोर - मनमाड कॉरिडोअर असे हे प्रकल्प येणार आहेत. याचवेळी मुंबई - गोवा महामार्गातील पळस्पे - इंदापूर या मार्गाची दुरवस्था ही मागील आघाडी सरकारचे पाप असल्याची टीका यावेळी गडकरी यांनी केली. मुंबई- गोवा मार्गाच्या पहिल्या टप्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असून मार्गाच्या दुरुस्तीसाठी 16 कोटी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.