फोर्ट इमारत दुर्घटना; तिघांचा मृत्यू, ६ जखमी

या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Jul 17, 2020, 12:07 AM IST
फोर्ट इमारत दुर्घटना; तिघांचा मृत्यू, ६ जखमी title=

मुंबई : मुंबईत पाऊस सुरु असून जोरदार पावसाच्या तडाख्याने मुंबईत एकाच दिवशी घर आणि इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. फोर्टमधील जीपीओसमोर पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

- 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे.

- इमारत दुर्घटनेत आणखी एकाचा मृत्यू, एकूण 3 जणांचा बळी - NDRF

- 6 जखमींवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु

- ढिगाऱ्याखालून 8 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.

- ढिगाऱ्याखाली आणखी 4-5 जण अडकले असल्याची शक्यता

- इमारतीच्या सुरक्षित असलेल्या भागातून 13 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

- थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल होणार

- दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत

संबंधित इमारत म्हाडाची सेस इमारत होती. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असून आतापर्यंत 4 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारत खाली करण्याचं काम सुरु असून, रहिवाशांना शिडीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

दुसरीकडे, पावसाच्या तडाख्याने मालाडमध्ये एक दुमजील घर कोसळलं आहे. मालाडच्या नुरी मस्जिदजवळ, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही लोक दबले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आतापर्यंत 4 लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. घटनास्थळी 4 फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.