VIDEO: मध्यरात्र, प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!

Theft Avoided Becaused Of Cat: एखाद्या सिनेमाला शोभेल असा प्रकार प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी घडला.

Pravin Dabholkar | Updated: Aug 28, 2024, 09:33 AM IST
VIDEO: मध्यरात्र, प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल! title=
mumbai Theft

Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही. मुंबईत एका प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी होणारी संभाव्य चोरी टळली.  घरी पाळलेल्या बोक्याने कमाल केली आणि चोर पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर बोक्याचे सगळीकडून कौतुक होतंय. काय घडली होती ही घटना? चोर कसा ऐटीत आला? आणि काहीच चोरी न करता कसा गुडूप झाला? हे सर्व जाणून घेऊया.   

मुंबईतल्या अंधेरीत फसलेल्या चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आलाय.बिल्डिंगमधील पाईपवरुन चढून चोर सहाव्या माळ्यावर राहणाऱ्या दिग्दर्शिकेच्या फ्लॅटमध्ये शिरला. मध्यरात्र असल्याने घरी सर्व झोपले होते. पण पाळलेला बोका मात्र जागा होता. त्याने प्रसंगावधन दाखवलं आणि मोठी चोरी टळली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashoke Pandit (@ashokepandit1)

प्रसिद्ध दिग्दर्शक स्वप्ना जोशी या अंधेरी येथे फॅल्टमध्ये राहतात. रविवारी मध्यरात्री 3.30 मिनिटांनी एक चोर त्यांच्या घरी शिरला. सहाव्या माळ्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये तो बिल्डिंगमधील पाईपच्या आधारे आला होता. चोरी करुन नेण्यासाठी काहीतरी मिळेल, या उद्देशाने तो फ्लॅटमध्ये इकडे तिकडे भटकत राहिला. खूप किंमती वस्तू त्याच्या नजरेस पडल्या. ज्यावेळी चोर घरभर फिरत होता तेव्हा स्वप्ना जोशी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. त्यामुळे काय चाललंय याबद्दल त्यांना माहिती नव्हते. पण सीसीटीव्ही आपले काम चोखपणे बजावत होता. बेडरुममधील आणि हॉलमधील सीसीटीव्ही चोराच्या सर्व हालचाली कैद करत होते. चोराचे त्याकडे लक्ष नव्हते. तरीही तो काही चोरुन नेऊ शकला नाही. यामागे कारण होता बोका. 

बोक्यामुळे वाचली चोरी 

फ्लॅटमध्ये बोकादेखील आहे, हे चोराला माहिती नव्हतं. बोक्याने चोराला पाहिलं. त्यानंतर तो सोफ्याच्या मागे जाऊन लपला आणि वेळ साधून बोक्याने आवाज काढून सर्वांना जागे केले. बोक्याच्या मोठ्या आवाजामुळे चोर बिथरला. मांजराचा मोठमोठ्याने आलेला आवाज ऐकून स्वप्ना यांनी सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनादेखील बोलावण्यात आले. पोलिसांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला. तोपर्यंत चोराने 6 हजार रुपये लंपास केले होते. 

सीसीटीव्हीमध्ये घटना कैद 

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये चोर फ्लॅटच्या हॉलमध्ये आलेला दिसतोय. पुढे स्वप्ना जोशींच्या बेडरुमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.  स्वप्ना जोशींची आई बेडवर झोपली होती तर केअर टेकर खाली जमिनीवर झोपली होती. एकदा चोर दरवाजा उघडतो तेव्हा प्रकाश डोळ्यावर येऊन केअरटेकरला जाग येते. पण चोर दरवाजा बंद करतो. काही करुन बेडरुममध्ये घुसावे यासाठी तो पुन्हा दरवाजा उघडतो. 

डारेक्टरच्या जावयाला आली जाग 

जसे मांजर स्वप्ना यांचे जावई आणि मुलगी राहत असलेल्या रुममध्ये आला तसे त्यांच्या जावयाला जाग आली. त्याने चोर चोर म्हणून ओरडायला सुरुवात गेला. यानंतर पाठलाग करुन चोराला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.