अरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार

धारावीसह जी नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्येतही भर पडली आहे.

Updated: May 13, 2020, 06:31 PM IST
अरे देवा! धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या पार title=

मुंबई: राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या धारावीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून धारावीत नव्याने सापडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज यामध्ये आणखी ६६ जणांची भर पडली. त्यामुळे धारावीतील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०२८ इतकी आहे. तर मृतांचा एकूण आकडा ४० वर जाऊन पोहोचला आहे. 

मुंबईत कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरतेय 'हे' औषध

तर धारावीसह जी नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या दादर आणि माहीम परिसरातील रुग्णसंख्येतही भर पडली आहे. दादरमध्ये ८ नवे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे इथल्या एकूण रूग्णांची संख्या १३३ झाली आहे. तर माहिममध्ये १२ नवे रूग्ण वाढले असून आता एकूण कोरोना रूग्णांची संख्या १५५ इतकी झाली आहे.

कोरोनामुळे मुंबईत विद्युत शवदाहिन्यांची ही अवस्था

सध्याच्या घडीला देशात मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत. पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तरीही शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पालिका प्रशासनाच्या अपयशामुळे मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती.