मुंबई: मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत गुरुवारी आणखी २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा २१४ इतक झाला आहे. तर मृतांची संख्या १३ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे माहीम परिसरातही कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळले आहेत.
३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
आज सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये चार महिला आणि दोन पुरुष आहेत. माहीममधील एकूण रुग्णसंख्या २४वर पोहोचली आहे. दादर, धारावी आणि माहीम हा परिसर मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डमध्ये येतो. सध्या हा वॉर्ड कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरत आहे.
One dead and 25 new #Coronavirus positive cases have been reported in Dharavi. The total number of positive cases increase to 214 and death toll rises to 13 in the area: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra
— ANI (@ANI) April 23, 2020
'३ मे नंतरही आतासारखाच लॉकडाऊन राहिल्यास परिणाम भयावह असतील'
आजच दादरच्या पोलीस कॉलनीत आणखी एक महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दादरमधील एकूण रूग्णसंख्या २८ इतकी झाली आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. या भागातील संसर्ग कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. धारावीतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनासमोर आहे.