दादर हत्या प्रकरणाचं दुबई कनेक्शन? व्हिडीओ कॉल करत मित्राची हत्या... 'ती' तरुणी कोण?

Dadar Muuder Mystery : मुंबईतल्या दादर इथल्या खून प्रकरणात धक्कादायक सुटकेसमधून मृतदेह नेणा-या दोघांना दादर रेल्वे स्थानकात अटक करण्यात आलीय... या दोघांनी आपल्या तिस-या मित्राची हत्या केली... नेमकं काय घडलं? या प्रकरणात पोलीस तपासात कोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्यात?   

राजीव कासले | Updated: Aug 7, 2024, 05:59 PM IST
दादर हत्या प्रकरणाचं दुबई कनेक्शन? व्हिडीओ कॉल करत मित्राची हत्या... 'ती' तरुणी कोण? title=

Dadar Murder Mystery : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात (Dadar Railway Station) सोमवारी रात्री बाराच्या सुमारास तुतारी एक्स्प्रेसमध्ये एक सुटकेस चढवताना एका युवकाची दमछाक झाली. गस्तीवरील पोलिसांना या युवकाच्या हालचाली संशयास्पद असल्याचं दिसून आल्या. चौकशी दरम्यान या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली. चार तासांत या प्रकरणाची उकल पोलिसांनी केली असून त्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मृतक तसंच आरोपी हे मूक बधिर आहेत. 

मित्रांनीच केली मित्राची हत्या
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 11 इथं एक अनोळखी व्यक्ती सोमवारी सकाळी एक मोठी ट्रॉली बॅग (Trolly Bag) घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली. त्यात रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. तपासात तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (वय 30) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. 

अशी झाली ओळख
सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या मूकबधिर अर्शद अली सादीक अली शेख याची पायधुनी इथल्या जय प्रवीण चावडा आणि शिवजीत कुमार सिंग यांच्यासोबत क्रिकेट खेळातून मैत्री झाली होती. प्रत्येक रविवारी हे तिघेही जयच्या घरी दारु पार्टी करत होते. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले, यावेळी अर्शद आणि शिवजीत यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. अर्शदला नग्न करत सुरु असलेला हाणामारीचा प्रकार व्हिडिओ कॉल (Video Call) द्वारे जय नातेवाईकांना दाखवत होता. त्याचदरम्यान शिवजीतनं रुममध्ये पडलेल्या हातोडीनं अर्शदच्या डोक्यात प्रहार करत त्याची हत्या केली.

शिवजीत दारुच्या नशेत असल्यानं त्यानं धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जयवर सोपवली होती. त्यामुळे अर्शदचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून दादरच्या फलाट क्रमांक 11 वर जय याने तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या संशयित हालचालींवरून त्याच्या बॅगची झडती घेताच हा प्रकार उघडकीस आलाय. हे दोघेही मूकबधीर असल्यानं अनेक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत.. 

ती तरुणी  कोण?
चौकशीदरम्यानं व्हिडिओ कॉल केलेला तो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय. यामधील एक तरुणी अर्शदला मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडिओ कॉलमधील व्यक्ती या हत्येची मास्टमाइंड असून ती दुबईत असल्याची शक्यता आहे. या हत्येला नेमंक पैशांचं कारण आहे की प्रेमप्रकरणाची किनार आहे, हे पोलीस तपासात समोर येईल. त्यामुळे सुरुवातीला सरळसोट हत्येचा प्रकार वाटणारं हे प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचं असल्याचं दिसत आहे..