मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील 20 हजारांवर गेलेली कोरोना दैनंदिन रुग्णसंख्या (Mumbai Corona Update) ही आता नियंत्रणात येताना दिसत आहे. मुंबईत काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत घट होत आहे. मुंबईत शनिवार 15 जानेवारीच्या तुलनेत आज (16 जानेवारी) रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी जवळपास 3 हजारांनी घट झाली आहे. (mumbai corona update 16 january 2022 today 7 thousand 895 corona positive patients found in city)
मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 895 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात 15 जानेवारीला 10 हजार 661 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
किती रुग्ण बरे?
दिवसभरात एकूण 21 हजार 25 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे. तसेच कोरोना रुग्ण दुप्प्टीच्या काळात वाढ झाली आहे. कोरोना डबलिंगचा रेट हा 48 दिवसांवर आला आहे.
मुंबईतील रुग्णसंख्येत सातत्याने घट होतेय. अर्थात असं असलं तरी लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे.
मुंबईतील तारीखनिहाय आकडेवारी
1 जानेवारी - 6 हजार 347
2 जानेवारी - 8 हजार 063
3 जानेवारी - 8 हजार 082
4 जानेवारी - 10 हजार 860
5 जानेवारी - 15 हजार 166
6 जानेवारी - 20 हजार 181
7 जानेवारी- 20 हजार 971
8 जानेवारी- 20 हजार 318
9 जानेवारी - 19 हजार 474
10 जानेवारी - 13 हजार 648
11 जानेवारी - 11 हजार 647
12 जानेवारी - 16 हजार 420
13 जानेवारी - 13 हजार 702
14 जानेवारी - 11 हजार 317
15 जानेवारी - 10 हजार 661
16 जानेवारी - 7 हजार 895