कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीत आग, एकाचा मृत्यू दोन जखमी

 मुंबईच्या कुलाबा परिसरात आग लागली आहे.

Updated: Jul 21, 2019, 04:36 PM IST
कुलाब्यातील चर्चिल चेंबर इमारतीत आग, एकाचा मृत्यू दोन जखमी title=

मुंबई : मुंबईच्या कुलाबा परिसरातील  चर्चिल चेंबर इमारतील आग लागली आहे. दुपारी  १२.३०च्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी १२ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात  यश आले आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे आग विझवण्यात अडचणी निर्माण होत आहे. धुराच्या  लोटामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लागलेल्या आगीमध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानीकांना रायडच्या माध्यमातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. ताज हॉटेल जवळ ही आग लागली आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे घरामध्ये लोक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्यटनाचा भाग असल्यामुळे या परिसरात कायम वर्दळ असते. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.