मुंबई विमानतळाचा World Record! गौतम अदानींनी दिली Good News; म्हणाले, 'एकाच दिवशी..'

Mumbai Airport New Record: मुंबई विमानतळाने मागील 10 दिवसांच्या कालावधीमध्ये दुसरा मोठा विक्रम आपल्या नावे केला असून गौतम अदानी यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 19, 2023, 03:01 PM IST
मुंबई विमानतळाचा World Record! गौतम अदानींनी दिली Good News; म्हणाले, 'एकाच दिवशी..' title=
गौतम अदानींनी केली घोषणा

Mumbai Airport New Record: मुंबई विमानतळाने एक ऐतिहासिक कामगिरी केली असून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन (सीएसएमआयए) एकाच दिवशी विक्रमी संख्येनं प्रवाशांची प्रवास केला आहे. मुंबई विमानतळावरुन एकाच दिवशी तब्बल 1 लाख 61 हजार 760 प्रवाशांनी प्रवास केला आहे. सीएसएमआयए सध्या सिंगल रनवे विमानतळ म्हणून कार्यरत आहे. मुंबई विमानतळाच्या या विक्रमाची माहिती अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून दिली आहे.

काय म्हणाले गौतम अदानी?

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबई विमानतळाच्या विक्रमाची माहिती दिली आहे. "एक ऐतिहासिक कामगिरी! 11 नोव्हेंबर 2023 रोजी आम्ही 24 तासांमध्ये 1 हजार 32 उड्डाणांचा विश्वविक्रम करत सर्वात व्यस्त असा एअर ट्रॅफिक डे साजरा केला. आज आम्ही मुंबई विमानतळाला एक नवीन सन्मान प्राप्त केला आहे. या सिंगल रनवे विमानतळावरुन एकाच दिवशी 1 लाख 61 हजार 760 प्रवाशांनी प्रवाशांना सेवा दिली. यासाठी एएआय, सीआयएसएफ, इमीग्रेशन आणि कस्टम, एअरलाइन्स भागीदार आणि सीएसएमआयएमधील आमच्या अदानी समुहाच्या तुकड्यांचं मी त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आभार मानतो. जय हिंद!" असं गौतम अदानी म्हणाले आहेत.

प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम

दिवाळीनिमित्त मुंबई एअरपोर्टवरुन एक हजाराहून अधिक विमानांचं एअर ट्रॅफिक मुव्हमेंट्स (एटीएम) दिसून आल्या. 11 नोव्हेंबर रोजी 1032 विमानांनी टेकऑफ आणि लॅण्डींग केलं. सीएसएमआयएसाठी हे फार मोठं यश आहे. आता एका दिवसात 1 लाख 61 हजार 760 प्रवाशांना सेवा देण्याचा विक्रम मुंबई विमानतळाने आपल्या नावे केला आहे. सुरक्षा आणि पॅसेंजर सेवेच्या स्तरावर मुंबई विमानतळाने केलेली ही कामगिरी विमानतळाची क्षमता जागतिक स्तरावर अधोरेखित करणारी आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अदानी ग्रुप पाहतं. मुंबईबरोबरच देशातील अनेक विमानतळांचं व्यवस्थापन अदानी ग्रुपकडून केलं जात आहे.