Mumbai School Update : राज्यासह मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (Mumbai Munincipal Corporation) शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे (1st to 9th Standard School) आणि 11 वीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील.
दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन शाळा (Offline School) बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा (Online School) सुरु राहाणार आहेत. मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांसाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या होत्या. पण डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकट्या मुंबईत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ८ हजाराहून अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यात इतर जिल्ह्यातील शाळा काय निर्णय घेतात, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.