मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आरोपींच्या हिटलिस्टवर

'अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केलं?'

Updated: Aug 31, 2018, 02:16 PM IST
मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आरोपींच्या हिटलिस्टवर title=

मुंबई : नालासोपारा स्फोटक प्रकरणी अविनाश पवारच्या कोठडी संदर्भातल्या मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी दरम्यान धक्कादायक माहिती पुढे आलीय. आरोपींच्या निशाण्यावर श्याम मानव, मुक्ता दाभोळकर, जितेंद्र आव्हाड हेदेखील होते, असं एटीएसच्या डायरीत म्हटलंय. 

दरम्यान न्यायालयानं गौरी लंकेश हत्ये प्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांडपासून एटीएसने केला आहे. मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केलं? असा प्रश्न न्यायालयानं एटीएसला विचारलाय.