मुंबई : केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला हवामान पोषक असून 8 तारखेपर्यंत म्हणजे गुरूवारपर्यंत मान्सून गोव्यामध्ये दाखल होईल, असं भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी सांगितलं आहे.
१३ किंवा १४ तारखेला मान्सून मुंबईमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे. याखेरीज आणखी एक गुडन्यूज हवामान खात्यानं दिलीये. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. जुलैमध्ये पहिल्या अंदाजामध्ये 96 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत करण्यात आलं होतं. त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्यात आलीये. एकंदरीत यंदाही देशाच्या सर्व भागांमध्ये मान्सूनचं प्रमाण चांगलं असेल, अशी शक्यता आहे.