मनसेचे इंग्रजी पाट्यानंतर 'गुजराती' टार्गेट

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतलाय. इंग्रजी पाट्यानंतर आता गुजराती पाट्यांविरोधात मनसे अधिक आक्रमक झालेय. दादर परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

Updated: Jul 28, 2017, 11:21 PM IST
मनसेचे इंग्रजी पाट्यानंतर 'गुजराती' टार्गेट title=

 मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतलाय. इंग्रजी पाट्यानंतर आता गुजराती पाट्यांविरोधात मनसे अधिक आक्रमक झालेय. दादर परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेनेने जोरदार मार खाल्ला. मात्र, पक्ष स्थापनेनंतर जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, मनसेचा हा करिष्मा ओसरला. मनसेला मतदानातून कौल मिळाला नाही. त्यामुळे मनसे बॅकफुटवर आला. 

सुरुवातीला मनसेनेने मराठी पाट्यांचे आंदोलन हाती घेतले होते. मात्र, यावेळी इंग्रजी किंवा हिंदी नव्हे, तर गुजराती भाषेतील पाट्या मनसेचे टार्गेट ठरल्या आहेत. दादर भागातील काही गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली आहे. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर भागातील काही दुकानांवर गुजरातील भाषेतील पाट्या झळकत होत्या. मनसे कार्यकर्त्यांनी या पाट्या काढून फेकून दिल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम उत्तर भारतीयांना लक्ष्य केलं होते.