मनसेच्या 'त्या' पाच कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई

सांताक्रूझमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

Updated: Oct 24, 2017, 09:01 PM IST
मनसेच्या 'त्या' पाच कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई  title=

मुंबई : सांताक्रूझमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

मनसेचे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पुढच्या 10 दिवसांसाठी सांताक्रूझमधून हद्दपार करण्यात आलंय. 

मंगळवारी सकाळी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पाच हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, या मनसे कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. पुढच्या महिनाभरासाठी त्यांना हद्दपार केलं जावं, अशी मागणी पोलिसांनी केली. तेव्हा पुढचे 10 दिवस विभागात राहण्यास न्यायालयानं त्यांना मनाई केलीय.